नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांस अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, प्रशासकीय अधिकारी श्री.उत्तम खरात, श्री.विलास मलुष्टे, श्री.रवी जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.