पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी स्वीकारला पदभार
नवीन पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी पदभार स्वीकारला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आल्या. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ मध्ये कार्यरत असणारे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ येथे करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा पदभार पनवेल येथे स्वीकारला आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.