संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
नवीन पनवेल : चर्मकार समाजातील थोर संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पनवेलचे माजी नगरसेवक गटई कामगार युनियनचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवदास कांबळे व उद्योगपती रवी पाटील व चर्मकार समाजातील बंधू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्मकार समाजाचे चर्मकार भवन निर्मितीसाठी गटई कामगारांच्या प्रश्नासाठी आग्रही राहणार असल्याचे मत गटई कामगार युनियनचे अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी यावेळी समाज बांधवांसमोर भाषण करताना व्यक्त केले.