वैश्य समाजातर्फे 4 फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 वैश्य समाजातर्फे 4 फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

नवीन पनवेल : रायगड जिल्हा वैश्य समाज संघ, रायगड जिल्हा वैश्य समाज महिला संघटना, देवन्हावे वैश्य समाज व अंकित साखरे पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन साईनाथ हॉटेल समोरील मैदान, देवन्हावे येथे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. 

        यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर असणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक भोपतराव, स्वागताध्यक्ष अंकित साखरे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार सदा सरवणकर, उमेश कोंडलेकर श्रद्धा साखरे, विलास मनोरे, मनोज आंग्रे, महेश पोटे, प्रदीप दलाल, राहुल साखरे असणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व वैश्य बांधव, बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे आणि महिलांना व मुलींना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन रायगड जिल्हा महिला वैश्य समाज अध्यक्ष शामल आंग्रे आणि उपाध्यक्ष हर्षला तांबोळी, वीणा शहाणे, खजिनदार स्मिता वाणी यांनी केले आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image