खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात;सर्वेक्षण न झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आयुक्तांचे आवाहन-सर्वेक्षणास 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात;सर्वेक्षण न झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आयुक्तांचे आवाहन-सर्वेक्षणास 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


पनवेल,दि.31 :महाराष्ट्र राज्य व मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दिनांक २३ जानेवारी पासून महापालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. याकामासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपायुक्त गणेश शेटे हे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर पाचही प्रभाग अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी म्हणुन काम पहात आहेत. त्यांच्या अंतर्गत 34 परीक्षक व त्या अंतर्गत 719 प्रगणक अशी रचना करण्यात आलेली आहे. 

 दरम्यान या सर्वेक्षणास 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे मिळाली असून आज दिनांक 31 जानेवारी रोजी उपायुक्त गणेश शेटे यांनी खारघर प्रभागातील सर्वेक्षणास भेट देऊन पर्यवेक्षकांच्या व प्रगणकांच्या अडचणी समजून घेतल्या. महापालिकेच्यावतीने दिनांक २३ जानेवारी पासून आतापर्यंत एकूण 1 लाख 85 हजार इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रगणक शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करत आहेत. तरीही ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नसेल तर अशा कुटुंब प्रमुखांनी आपले क्षेत्रीय कार्यालय किंवा आपल्या प्रभाग कार्यालयांशी संपर्क साधावा ,असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.

याचबरोबर पालिका कार्यक्षेत्रातील सर्व सोसायट्यांनी प्रगणांकांना सर्वेक्षणासाठी परवानगी द्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.अनेक सोसायट्या प्रगणकांना सर्वेक्षणासाठी परवानगी देत नाहीत अशा सोसायटींचे पुन्हा सर्वेक्षण होणार नाही. त्याची सर्व जबाबदारी ही संबधित सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांची राहील असे महापालिकेच्यावतीने सूचित करण्यात आले आहे.

चौकट

नागरिकांनी आपले सर्वेक्षण झाले नसल्यास प्रभाग कार्यालयांतील सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

प्रभाग अ खारघर सहा. नोडल अधिकारी जितेंद्र मढवी मो.क्र.9819998788 

सहा. नोडल अधिकारी खारघर अरुण पाटील 8369293434

प्रभाग अ-1 नावडे अमर पाटील सहा. नोडल अधिकारी मो.क्र. 9833736989

सहा. नोडल अधिकारी नावडे, जगदीश पवार 9870767474

प्रभाग ब कळंबोली श्री. अरविंद पाटील सहा. नोडल अधिकारी  मो.क्र.9322351897

सहा. नोडल अधिकारी कळंबोली, अनंत बोलके 7977396518

प्रभाग क कामोठे  श्री. सदाशीव कवठे सहा. नोडल अधिकारी  मो.क्र. 9819633174

सहा. नोडल अधिकारी कामोठे सुमेध बलखंडे 7977176385

प्रभाग ड पनवेल श्री. रोशन माळी  सहा. नोडल अधिकारी  मो.क्र. 8108893585

सहा. नोडल अधिकारी पनवेल तुषार कामटेकर 9870459860

कोट

पनवेल महानगरपालिकेचे मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही अशा कुटुंब प्रमुखांनी आपले क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधवा.

पनवेल मनपा आयुक्त श्री. गणेश देशमुख