महावितरण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशन मध्ये बेकायदेशीर थाटले संसार
अपघात झाल्यास महावितरण चे अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईची मागणी
पनवेल /प्रतिनिधी
कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये कोणीही या आणि संसार थाटा अशी परिस्थिती असून महावितरणच्या कंत्राटदारावर मेहरबान होऊन आऊट सोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशन मध्ये घरच थाटले असून चक्क स्टोव्ह
गॅसची शेगडी चा वापर केला जात असल्याने या ज्वलनशील पदार्थामुळे स्फोट झाल्यास ट्रान्सफॉरमरला धोका निर्माण होऊन मोट्या प्रमाणात जीवित व महावितरणची वित्त हानी होऊ शकते .महावितरणकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसलेल्या कामगारांची कोणतीही इएसआय, ओळखपत्र ,कामगार कायदे नियमाप्रमाणे तसेच महावितरणच्या नियमांना बगल देत महावितरणच्या कंत्राटदारावर मेहरबान होऊन या ठिकाणी पूर्ण वेळ वास्तव्य डोळे असल्याने अपघाताची घटना घडल्यास महावितरणच्या संबंधित अधिकारी यांच्या वर निलंबनाची कारवाई करून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकांडून हात आहे
कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील लोकसंख्याच्या तुलनेत लाखांवर महावितरणचे वीज ग्राहक आहेत. कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनीतील स्वतंत्र सबस्टेशनं उभारण्यात आले आहे. कामोठे वसाहतीमध्ये महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून वसाहतींना विद्युत पुरवठा केला जातो हा विद्युत पुरवठा करण्यासाठी काही सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मर उभारले गेले आहेत . कामोठे येथील सबस्टेशनंमध्ये सहाय्यक अभियंता यांचेही कार्यालय आहे. कामोठे सेक्टर 9 प्लॉट न. 40 च्या बाजूला असलेल्या या सबस्टेशनमध्ये कंत्राटदाराचे खाज़गी कामगार कोणीही वास्तव्यास असल्याचे उघड झाले असून महावितरणच्या नियमानुसार या परिसरात महावितरणचे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मनाई आहे . ओउटसर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करणाऱ्यांनी या सबस्टेशन बाजूला आपला संसार थाटला आहे. यावेळी बाजूलाच सुमारे 10 MT चा ट्रान्सफॉर्मर असून देखील ,स्टोव्ह ,शेगडी पेटविली जात आहे कंत्राटदाराचे खाजगी कामगार महावितरणची मोफत वीज पाणी यासह अनेक सेवा घेत आहेत . खांदा कॉलनी सेक्टर 1 प्लॉट न. 9 च्या बाजूला तोच प्रकार असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर कळंबोली गुरुद्वाराच्या पुढे असलेल्या सबस्टेशनमध्येही काहींनी आपला संसार थाटला आहे.या सर्व बाबी मुळे ट्रान्सफॉर्मरच गॅसवर असल्याचे दिसून येत आहे , कारण या कुटूंबाना लागणारे जेवण याच ठिकाणी बनवले जाते. आणि त्यासाठी ज्वलनशील पदार्थ गॅस,स्टोव्ह वापरले जात असल्याने या कामगारांना तातडीने तेथून हटवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील सबस्टेशनमध्ये ओउटसर्सिंग चे कामगार राहतात. त्याचबरोबर सबस्टेशनमध्ये गॅस शेगडीचा वापर केला जात असल्यास याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- श्री. सरोदे - कार्यकारी अभियंता, भिंगारी, महावितरण