उरण तालुका व शहर काँग्रेस तर्फे रेल्वेच्या विरोधात गाजर दाखवा आंदोलन
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) जनतेसाठी सर्वात स्वस्त व सुरक्षेचा सर्वात चांगला प्रवास म्हणून रेल्वे सेवेकडे पाहिले जाते.मुंबईच्या बाजूला असून सुद्धा उरण तालुक्यात आजपर्यंत रेल्वे धावली नाही. उरण मधील जनता रेल्वे सेवेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिली आहे.मात्र गेल्या वर्षीपासून रेल्वेचे काम प्रगती पथावर आहे.६ महिन्यापूर्वी उरण ते खारकोपर रेल्वेचे डेमो सुद्धा झाले. ६ महिन्यापूर्वी उरण ते खारकोपर रेल्वे धावली. व रेल्वेची चाचपणी सुद्धा झाली.मात्र ६ महिने उलटूनही अद्यापही उरण ते खारकोपर रेल्वे सेवा सुरु झाली नाही. संपूर्ण उरण तालुक्यात कुठेही रेल्वे सेवा सुरु झाली नाही.रेल्वेचे प्रशासनातर्फे रेल्वे सुरु होणार असल्याच्या तारखा वारंवार बदलण्यात येत आहेत. वर्षभरात अनेकदा रेल्वे सेवा सुरू होणार अशा बातम्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे उरणची जनता रेल्वे सेवा सुरु होणार म्हणून आनंदात होते. मात्र रेल्वे प्रशासन रेल्वे सुरु होण्याच्या तारखा वारंवार बदलत असल्याने उरणच्या नागरिकांत या गोष्टी विषयी असंतोष निर्माण झाले आहे.रेल्वेचे सर्व काम ६ महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे तरी अद्यापही रेल्वे सेवा उरण मध्ये सुरु होत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासन वारंवार तारखा बदलत असल्याने व जनतेच्या समस्यांचा, भावनांचा विचार होत नसल्याने उरण तालुका व उरण शहर काँग्रेसने याबाबत आक्रमक भूमिका घेत काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरवार दि ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता उरण रेल्वे स्टेशनच्या मेन गेट समोर जाऊन गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचा गाजर दाखवून निषेध केला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सरचिटणीस रेमंड लोवीयस,काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, राष्ट्र सेवा दल रायगड जिल्हा कार्याध्यक्ष वैभव ठाकूर,तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, माजी नगरसेवक बबन कांबळे,शहराध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष अफशा मुकरी,देविदास थळी आदींनी आपले मनोगत व्यक्त करून रेल्वे सुरु होत नसल्याबाबत केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला.
मोदि सरकार व केंद्र सरकार वेगवेगळ इव्हेंट करण्यात व्यस्त आहेत. मोदी सरकार, केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्यातील सरकार हे प्रत्येक क्षेत्रात जनतेला फक्त गाजर दाखविण्याचे काम करत आहेत.त्यांच्या सगळ्या योजना या फसव्या आहेत. कुठल्याही योजनांची सरकार अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे या सर्व योजना फसव्या आहेत.केंद्र व राज्य सरकारचा तसेच त्यांचा फसव्या योजनांचा आम्ही गाजर दाखवून निषेध करीत आहोत.उरण रेल्वे स्टेशन ६ महिन्यापूर्वीच बनवून तयार आहे. मात्र ही रेल्वे सेवा मुद्दामून सुरु केली जात नाही त्याचे कारण भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही गोष्टीचे इव्हेंट करण्यामध्ये रस आहे. इव्हेंट करून रेल्वे सेवा सुरु करायचे असल्याने मुहूर्त बघून त्यांना उदघाटन करायचे आहे. त्यामुळे रेल्वे उदघाटनचे 'तारीख पे तारीख' सुरु आहे.भाजपा व भाजपच्या मित्र पक्षांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. उरणची रेल्वे त्वरित सुरु व्हावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत.मात्र या गोष्टीकडे केंद्र व राज्य सरकारने नेहमी कानाडोळा केला आहे.उरण मध्ये रेल्वे त्वरित सुरु व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. आज सर्वसामान्य माणसाला, गोर गरीब जनतेला, नोकर वर्गाना, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाता येत नाहीत. प्रवास करता येत नाहीत. संपूर्ण उरण तालुक्यात कुठेही रेल्वे सेवा सुरु झाली नाही.रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशी वर्गांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी म्हणून हे गाजर दाखवा आंदोलन केले असल्याची माहिती काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली. यावेळी लवकरात लवकर रेल्वे सुरु करावी अशी मागणी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र व महाराष्ट्र प्रशासनाकडे केली आहे. जर रेल्वे सेवा त्वरित सुरु झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उरण तालुका व उरण शहर काँग्रेस तर्फे केंद्र व राज्य प्रशासनाला देण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष संध्या ठाकूर,जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित, इंटक जिल्हा सरचिटणीस जयवंत पाटील,शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर, उपशहराध्यक्ष चंदा मेवाती, सरचिटणीस अमीना पटेल, उपसरपंच दिपक ठाकूर, रियाज फकिह, मुजमिल मुकरी, मोहन गटणे, धनंजय नाईक आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश पाटील,बबन कांबळे यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.