पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा निलेश सोनावणे यांची पुर्ननिवड

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सहाव्यांदा निलेश सोनावणे यांची पुर्ननिवड


पनवेल/प्रतिनिधी

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल शासकीय विश्रामगृहात  पार पडली. यावेळी 2024 च्या. अध्यक्षपदी सर्वानुमते पनवेल युवा चे संपादक जेष्ठ पत्रकार  निलेश सोनावणे यांची  सहाव्यांदा  निवड करण्यात आली.यावेळी रायगड सम्राट चे संपादक शंकर वायदंडे , फोर के चॅनेल चे संपादक गौरव जहागीरदार ,महाराष्ट्र  ०९ चे संपादक रवींद्र गायकवाड, युवक आधार चे संपादक संतोष आमले, नवराष्ट्र चे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे , रायगड टाइम्स चे प्रतिनिधी राम बोरीले , जेष्ठ पत्रकार दिपक महाडिक यांच्यसह समितीचे सदस्य पत्रकार मित्र उपस्तिथ होते  निलेश सोनावणे यांची अध्यक्षपदी पुर्ननिवड झाल्याबद्दल लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवून पत्रकारांसाठी सातत्याने उपक्रम राबवणारे निलेश सोनावणे हे अतिशय चांगले काम करीत असल्यानेच त्यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली असून त्यांना  लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी  शुभेच्छा दिल्या  .

यावेळी निलेश सोनावणे यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा  आपल्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व नवीन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येतील तसेच लवकरच पुढील वर्षांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येईल असे सांगितले.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image