उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी सनी म्हात्रे, तालुका युवक उपाध्यक्ष पदी अमित साहू यांची नियुक्ती

 

उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी सनी म्हात्रे, तालुका युवक उपाध्यक्ष पदी अमित साहू यांची नियुक्ती.


उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन युवकांचा सहभाग होऊन राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी  आणि प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे  यांच्या प्रयत्नाने उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी सनी म्हात्रे आणि उरण तालुका युवक उपाध्यक्षपदी अमित साहू यांची नियुक्ती केली. त्यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. भार्गव पाटील,  रायगड जिल्हा सरचिटणीस  किशोर ठाकूर,  विधानसभा अध्यक्ष  वैजनाथ ठाकूर, तालुका अध्यक्ष  परीक्षीत ठाकूर , शहराध्यक्ष तुषार ठाकूर,  युवक तालुकाध्यक्ष समत भोंगले,  तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, राजू जाधव, सुरेंद्र शिंदे आणि इतर कार्यकर्ते हजर होते. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करून पक्ष्याची ध्येय धोरणे समाजाला समजाऊन देऊन तरुणांनी राजकारणात पुढाकार व सहभाग घ्यावा असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.