मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; शनिवारी नियोजन आढावा बैठक

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; शनिवारी नियोजन आढावा बैठक 


पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका व शहरातील गरिब व गरजू जनतेसाठी 'मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'चे  आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक शनिवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०६. ३० वाजता खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

      या महाशिबिरात आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचार मोफत केले जाते. याचा १५ हजारहून अधिक नागरिक लाभ घेत असतात, त्यामुळे सर्व रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी या नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात हि बैठक होणार असून समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image