महापालिकेच्यावतीने गणेश उत्सव मंडपासाठी ऑनलाईन पध्दतीने एक खिडकी योजनेतून परवाना


महापालिकेच्यावतीने गणेश उत्सव मंडपासाठी ऑनलाईन पध्दतीने एक खिडकी योजनेतून परवाना


पनवेल,दि.21: आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी महापालिकेच्यावतीने गणेश उत्सव मंडपासाठी ऑनलाईन परवाना पद्धत सुरू केली आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शासन निर्णयाप्रमाणे परवानगी विनाशुल्क  मिळणार आहे.  महापालिका क्षेत्रातील गणोशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी  https://smartpmc.co.in/ ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आले आहे.

         यावर्षी 19 सप्टेंबर, 2023 पासुन गणेशोत्सव सुरु होत आहे. गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांसाठी तातडीने परवाना देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन पध्दतीने एक खिडकी योजना अमंलात आणली आहे.  

        शहरातील रस्त्यांवर सार्वजनिक मंडळांच्यावतीने गणेशोत्सव समारंभाच्या वेळी  रस्त्यांवर मंडप उभारले जातात, रस्त्यावर पादचारी मार्गावर खड्डे खोदल्याने रहदारीस, वाहतुकीस, पादचाऱ्यांना अडचण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा होत असतो. अशा पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात  उभारण्यात येणाऱ्या मंडप व तत्सम रचना महापालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय उभारता येत नाही. तसेच त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पुर्वपरवानगी शिवाय जाहिरात फलक , फ्लेक्स लावण्यास  मनाई आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत गेले दोन वर्षापासुन एक खिडकी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वेबसाईटवरती सिटीझन सर्व्हिस यामधून सर्व मंडळांना मंडप परवानगी देण्यात येते. तसेच https://smartpmc.co.in/ या वेबसाईटवरती गेल्यास मंडप परवानगी देण्यात येत आहे.

      पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक उत्सव मंडळांनी व नागरीकांनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन ॲप्लीकेशन नोंदवल्यास, उत्सवाच्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात मंडपास   परवानगी मिळणार असल्याची माहिती उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरीकांच्या वेळेची काही प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image