जे.एम.म्हात्रे चॕरिटेबल ट्रस्टने रानसई आणि वेश्वी आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना केलं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : दूर - दुर्गम ,डोंगर - दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी - रोजगाराची साधनंच उध्वस्त होऊन त्यांचं जगणंच मुश्किल झालेलं आहे या परिस्थितीत त्या आदिवासीं बांधवांच्या सुख - दुःखात त्यांच्या हाकेला धाऊन जावून त्यांना मदतीचा हात देणारे. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे.अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या औदार्यातून...आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून ... आज ...उरण - रानसई येथील ... *चांदयली आदिवासींवाडी, ...भुऱ्याचीवाडी, ...मार्गाचीवाडी, बंगल्याचीवाडी,...सागाचीवाडी* ...आणि ... *वेश्वी आदिवासींवाडी* या आदिवासीं वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना ...*तांदूळ, गव्हाचपीठ,साखर, डाळ, मीठ,चहापावडर, साबण, बिस्किटं* ... या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं गेलं ...आणि... महिला भगिनीं करिता *साड्यांच* वाटप देखील करण्यात आले.