नरेंद्र मोदी ३२५ ते ३५०+ जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान होणार - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

नरेंद्र मोदी ३२५ ते ३५०+ जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान होणार  - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर 

प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद


पनवेल(प्रतिनिधी) कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी दिवसरात्र काम करीत आहेत, त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ३२५ ते ३५०  जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पनवेल येथे झालेल्या व्याख्यानातून केली. त्याचबरोबर विरोधक फक्त विरोधाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी (दि. ३०) सायंकाळी ५ वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध पत्रकार व प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर व मा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन व टीमने या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते. व्याख्यानाला पनवेलच्या नागरिकांनी तसेच 'भाऊ' प्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला.

व्याख्यानाचा विषय होता 'बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान' भाऊ तोरसेकर ह्यांनी त्यांच्या शैली मध्ये अनेक उदाहरणं, प्रसंग, किस्से सांगत देशात घडत असेलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र मोदी ह्यांची कार्यपद्धती, कामाप्रति व देशाप्रति असलेला त्यांचा प्रामाणिक पणा, चिकाटी या बाबत सामान्य नागरिकांच्या मनातील भावना सांगितल्या. आज देशात वेगाने रास्ते बांधले जात आहेत, वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत आहेत. ज्याचे भूमीपूजन केले त्याचे उद्घाटन ही चार ते पाच वर्षाच्या आत केले आणि असे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातले कदाचित एकमेव पंतप्रधान असतील असे भाऊ म्हणाले. आज जगात भारत हा दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. देशात लोकांना एक प्रकारे जिंकण्याची सकारात्मक ऊर्जा जर कुठून मिळत असेल तर त्याचा स्त्रोत हा नरेंद्र मोदी आहे असे ते म्हणाले.

विरोधी मानसिकतेमुळे देशाचे खच्चीकरणाचे काम विरोधकांकडून होत असल्याचे सांगतानाच हे देशासाठी दुर्देवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ज्यांच्या काळात निरव मोदी, विजया मल्ल्या बँक बुडवून गेले ते आता स्वस्थ बसले आहेत आणि परत शहाणपण शिकवत आहेत. असे नमूद करतानाच आपण जे बघतो पण त्याची वस्तुस्तिथी काय आहे हे बघत नाही याचा संताप येतो. सरकार यशस्वीपणे चालवायचे असेल तर त्यात लोकांचा सहभाग असावा लागतो आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे. त्यामुळेच सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या शेजारील देश अन्नधान्यासाठी धडपडत आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ८० कोटी लोकांना गेली तीन वर्षे धान्य देत आहे. आणि अशा अनेक योजना सक्षमपणे राबविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. प्रत्येक वेळी विरोध आणि टीका हा विरोधकांचा जीवनाचा भाग झाला आहे, त्यामुळे कुठल्याही बाबीला लोकांच्या भावना काय आहेत हे न बघता स्वार्थपणा करणे चुकीचे आहे आणि विरोधक नेमकेच तेच करत आहेत. सास बहूच्या सिरीयल जशा काल्पनिक असतात त्याचप्रमाणे राहुल गांधी सोनिया गांधी यांचे राजकारण आहे. असे सांगतानाच सामान्य घरातील नरेंद्र मोदी कष्टाने पुढे आले आहेत त्यामुळे त्यांना सामान्य तळागातील लोकांची जाण आहे., असेही त्यांनी अधोरेखित केले. इर्शाळगडावर झालेल्या दुःखद दुर्घटनेची संवेदनशीलता मोठी होती पण परवा इर्शाळगड येथे माजी मुख्यमंत्री गेले ते पण व्हॅनिटी व्हॅनने. वरती गडाजवळ गेलेच नाहीच खालतीच आपली लुडबुड केली काय दुर्देव आहे आणि आणि ज्यांना ठाकरे गट खोके खोके म्हणत हिणवत असतात ते मुख्यमंत्री भर पावसात दोन तासाची पायपीट करून दुर्घटनास्थळी लोकांचे अश्रू आपले मानून गेले. बघा किती फरक आहे. अशा शब्दात भाऊंनी आपले मत प्रकट केले. 

       कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून झाली. त्या नंतर भा ज पा सांस्कृतिक सेल चे सदस्य वैभव बुवा ह्यांच्या प्रास्ताविक पर निवेदानातून त्यांनी कार्यक्रमाचा एकूण उद्देश लोकांसमोर मांडला. हयानंतर भाऊ तोरसेकर ह्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. ह्यावेळी भा ज पा सांस्कृतिक सेल च्या सदस्या ऋतुपर्णा किरटोणीया हिने भाऊंचे हुबेहूब काढलेले स्केच हे त्यांना भेट म्हणून देण्यात आले. भा ज पा उत्तर रायगड चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा विशेष सत्कार  भाजपा सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर अभिषेक पटवर्धन यांनी भाऊ तोरसेकर हयांची एका वेगळ्या शैलीत ओळख करून देत त्यांच्या सोशल मीडिया वरील फॉलोवर्सचा आणि इतर आकडेवारींचा वेध घेतला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, दीपक बेहेरे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारूशिला घरत, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, रुचिता लोंढे, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रवींद्र जोशी, सुमित झुंजारराव, अमरिष मोकल, गणेश जगताप, चिन्मय समेळ, अमोल खेर, निखिल गोरे, अक्षया चितळे, अंजली इनामदार, विद्या तामखेडे, बबन बरगजे, आदित्य उपाध्ये तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image