डॉ.राजेंद्र मगर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननिय रमेश बैस यांच्या शुभहस्ते गौरव

डॉ.राजेंद्र मगर यांचा महाराष्ट्राचे  राज्यपाल सन्माननिय रमेश बैस यांच्या शुभहस्ते गौरव


मुंबई (प्रतिनिधी)- डॉ.राजेंद्र मगर यांची संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी व संशोधन कार्यात विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन याबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.श्री.रमेश बैस यांच्या शुभहस्ते त्यांना गौरवण्यात आले.अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर त्यांची निवड झाली आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.रवींद्र कुलकर्णी व अंजुमन ए इस्लाम संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.झहिर काझी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.

       डाॕ.राजेंद्र बाबुराव मगर हे सातारा जिल्ह्यातील आमच्या ढोरोशी गावचे सुपुत्र असून महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण सहसंचालक डाॕ.सुनिल मगर यांचे धाकटे बंधू आहेत.मितभाषी आणि खिलाडू वृत्तीचे राजेंद्र मगर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनुक्रमे "जिल्हा परिषद शाळा ढोरोशी " व "श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले हायस्कुल ढोरोशी"येथे झाले.या दोन्ही शाळांमध्ये आम्ही एकत्रच शिकलो.ते दोन वर्ग आमच्या आगोदर होते.उच्च माध्यमिक आणि उच्च तसेच विद्यापिठीय शिक्षण त्यांनी मुंबईतून पूर्ण केले;पण खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी आपला संशोधन प्रबंध सुप्रसिद्ध अशा "मुंबई-I I T"त पूर्ण केला.पुढे नवी मुंबईतील नामांकीत अशा "फादर अॕगनल"इंजिनियरींग काॕलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.त्यानंतर पनवेल येथील पिल्लई इंजिनियरींग काॕलेजमध्ये विभाग प्रमुख (Head of department) पदोन्नतीने रूजू होत यशोशिखराच्या पायऱ्या सर करीत गेले.

         त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आमच्या सर्वांप्रमाणेच;पण मोठे बंधू महाराष्ट्राचे माध्यमिक शिक्षण सहसंचालक डाॕ.सुनिल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचा कल शिक्षण क्षेत्राकडे झुकला आणि त्यायोगे मोठे योगदान देता आले.

     तसे पाहता हे खूप मोठे यश आहे;पण मोठ्या बंधूंच्या अजून मोठ्या यशापुढे किंवा फायद्या-तोट्याच्या व्यावहारिकतेपुढे ते आमच्यासाठी थोडेसे दुर्लक्षित राहीले.२ हजार लोकवस्तीच्या छोट्या गावात आमचे सर्वांचेच ऋणानुबंध थोड्याफार फरकाने सारखेच.आम्ही सर्वजणच एकमेकांसाठी सुपरिचितच.डाॕक्टरांच्या यशात मलाच काय तर आमच्या गावाला आणि पंचक्रोशीत राहणाऱ्या सर्वांनाच आनंद आणि अभिमान आहे.त्यांचे संशोधन कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान आपल्या सर्वांच्या आणि राज्याच्या जडणघडणीस पूरक ठरावे,याच सदिच्छा आणि शुभेच्छा.