स्टार्टअपवर केंद्रित शाखांमध्ये नवी मुंबईचा समावेश

 स्टार्टअपवर केंद्रित शाखांमध्ये नवी मुंबईचा समावेश 


पनवेल (प्रतिनिधी)  सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेने स्टार्टअपवर केंद्रित शाखांच्या माध्यमातून तीन खास स्टार्टअप्स केंद्र लाँच केली आहेतत्यामध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. 

            बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरजनीश कर्नाटक यांनी आज  स्टार्टअपवर केंद्रित दोन शाखांचे व्हर्च्युअल उद्घाटन केलेतर तुर्भेनवी मुंबईतील स्टार्टअप शाखेचेउद्घाटन करण्यासाठी ते उपस्थित होतेया स्टार्टअप शाखा भारतात स्टार्ट-अप संस्कृतीला चालना देण्यासाठीनाविन्य व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहेतस्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून त्याद्वारे शाश्वत आर्थिक विकास करण्याचे आणि स्टार्ट – अप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय आहेभारत स्टार्टअप केंद्र म्हणून उदयास येत असून आतापर्यंत ९३ हजार स्टार्टअप्सची डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडकडे (डीपीआयटीनोंदणी झाली आहे या शाखा स्टार्टअप्सना आवश्यक त्या सर्वसेवा एकाच छताखाली पुरवतील आणि स्टार्टअप यंत्रणेतील उद्योजकांसाठी एखाद्या केंद्राप्रमाणे आर्थिक व इतर सुविधा देतीलया शाखांमध्ये स्वतंत्र स्टार्टअप डेस्क आणि रिलेशनशीप मॅनेजरचीही व्यवस्था असणार आहे. 

        याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरजनीश कर्नाटक म्हणालेबँक ऑफ इंडियाने आज मुंबईबेंगळुरू आणि दिल्लीपासून सुरुवात करत सात स्टार्टअप शाखांना तत्वतः मंजुरी दिली आहेया स्टार्टअप शाखा बँक ऑफ इंडियाच्या एमएसएमईबुकमध्ये समाविष्ट होतीलस्टार्टअपवर केंद्रित बेंगळुरूमध्ये बंगळुरू मुख्य शाखा,   नवी दिल्लीमध्ये संसद रस्ता शाखा,   नवी मुंबई येथे तुर्भे या तीन शाखा असून  बँक ऑफ इंडियाने आणखी ९ ठिकाणी स्टार्टअप केंद्रित शाखा सुरू करण्याचे ठरवले आहेही केंद्रे लवकरच कार्यान्वित होतीलगेल्या कित्येक दशकांपासून हि  बँक समाजातील सर्व घटकांची पसंतीची बँक असून देशभरात नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देण्यात आम्ही मुख्य भूमिका निभावली आहे.