"विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे"

 "विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखणे ही महत्त्वाचे"


पनवेल : आज केंद्र शासनाच्या "आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वृक्षारोपण"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी NHAI चे अधिकारी  श्री.अंशुमली श्रीवास्तव, श्री वाठोरे सर, श्री.डॉ.सुरेश कुमार, श्री.घोटकर सर, श्री भरत कुमार, पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते. 

   यावेळी बोलताना श्रीवास्तव यांनी सांगितले की, श्री.नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकासाची कामे करताना जेवढी वृक्षतोड केली जाते त्याच्या दुपटीने वृक्ष लागवड करून सदर रस्त्याचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखावा हे उद्दिष्ट नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया ने समोर ठेवले आहे.
    यावेळी बोलताना श्री.अंशुमली श्रीवास्तव यांनी सांगितले की जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आतापर्यंत केलेल्या  रस्त्याच्या कामाची गती पाहता दिलेल्या वेळेत गुणवत्ता राखून हे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि कोकणवासीयांना लवकरच चांगला रस्ता प्रवासादरम्यान अनुभवास मिळेल.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image