अडीच लाखांच्या 42 लोखंडी डोकाबिमची चोरी

 अडीच लाखांच्या 42 लोखंडी डोकाबिमची चोरी


नवीन पनवेल :कंपनीच्या कंपाउंडची जाळी उचकटून आत मध्ये प्रवेश करून दोन लाख 52 हजार रुपये किमतीचे 42 लोखंडी डोकाबिमची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      चौक येथे राहणारे सुनील देशपांडे हे कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर बारवई गाव येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या गोडाऊन मध्ये बांधकामा संदर्भातील साठ डोकाबिम होते. बुधवारी ते गोडाऊन मध्ये गेले असता 18 डोकाबिम शिल्लक असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता कोणाला काही माहिती नव्हते. यावेळी गोडाऊनची पाहणी केली असता कंपाउंड ची लोखंडी जाळी उचकटलेली त्यांना दिसली. त्यामुळे चोरट्यांनी कंपाउंड ची जाळी उचकटूनआत मध्ये प्रवेश केला आणि दोन लाख 52 हजार रुपये किमतीचे लोखंडी डोकाबीम चोरून नेले.


दोन लाख 46 हजारांचा गुटखा जप्त 
नवीन पनवेल : अमली विरोधी पथकाने सेक्टर 12, खारघर येथे पान टपरीचा व्यवसाय करणाऱ्या इसमाच्या ओवे गाव येथील झोपडीमध्ये छापा टाकून दोन लाख 46 हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला गुटखा जप्त केला आहे. त्याच्याकडे दोन लाख 16 हजार 960 रुपये सापडून आले आहेत.
           ओवेगाव, खारघर, सेक्टर 30 येथील अली पब्लिक स्कूलच्या बाजूला मोकळ्या जागेत असलेल्या झोपडी मध्ये एक इसम पान मसाला व प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी मोहम्मद मंजूर मोहम्मद गफूर अन्सारी (वय 38) त्याच्याकडे दोन लाख 46 हजार रुपयांचा गुटखा सापडून आला. व दोन लाख 16 हजार 960 रुपये सापडून आले. पोलिसांनी मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली आहे त्याने सदरचा माल हा महफुज (राहणार मुंब्रा) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले.


कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी, चौघां विरोधात गुन्हा
नवीन पनवेल : राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील सर्वसामान बाहेर ओसरीवर ठेवून कपाटात ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी चौघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         सोमटणे येथील माही मिलिंद मानकामे या एक जुलै रोजी सोमटणे येथील राहत्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर त्या कुटुंबासह देवदर्शनाला जेजुरी ते तुळजापूर असे गेले होते. पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या व त्यांची दोन्ही मुले देवदर्शन करून घरी आले असता घराला कुलूप नव्हते व त्यांच्या घरातील सर्व सामान घराच्या बाहेर ओसरीवर ठेवलेले होते. यावेळी रूम मालक अलंकार बबन भोईर, त्याची पत्नी, आई व अनोळखी इसम तेथे उभे होते. यावेळी अलंकार याने सामान आमचे आहे, तुम्ही कोण आहात असे बोलला. त्यावेळी घराबाहेर ठेवलेल्या सामानाची खात्री केली असता लोखंडी कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले. नऊ लाख रुपये आणि 24 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


-

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image