जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशी सार्वजनिक रूग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन


                                                                              

 

 

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशी सार्वजनिक रूग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन




 

नवी मुंबई/प्रतिनिधी-  ए, बी आणि ओ या रक्तगट प्रणालींचा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लॅंडस्टेनर यांचा जन्मदिन जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. नियमित ऐच्छिक विनामोबदला रक्तदानाविषयी जनजागरूकता वाढविण्यासाठी तसेच सर्व रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याकरिता हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

    `रक्त द्या, प्लाझ्मा द्या, जीवन शेअर करा, अनेकदा शेअर करा' असे या वर्षाचे जागतिक रक्तदान दिनाचे घोषवाक्य असून त्या अनुषंगाने नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रक्तकेंद्राच्या वतीने वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रशात जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक रक्तदान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

     यानिमित्त ऐच्छिक रक्तदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 14 जून या जागतिक रक्तदान दिनी रक्तदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार असून   २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे विशेष सत्कार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर आयोजकांनाही सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण जून महिन्यात प्रभातफेरी, व्याख्याने व व्हिडीओव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. 

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image