जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे नगरपालिका प्रशासनाकडून आयोजन

                                                                                                  

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे नगरपालिका प्रशासनाकडून आयोजन


*जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे नगरपालिका प्रशासनाला निर्देश*


अलिबाग,दि.25(जिमाका):- शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रातील अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात एकाच दिवशी दि.26 मे 2023 रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.  

     *अभियान राबविण्यात येणार त्या स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे :-*    

    अलिबाग नगर परिषद हद्दीतील अलिबाग बसस्थानकालगत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक, रस्त्याचे अंतर 500 मीटर, 

      पेण नगर परिषद हद्दीतील पेण-खोपोली रस्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्ता ते पेट्रोल पंप, रस्त्याचे अंतर 850 मीटर, 

      उरण नगर परिषद हद्दीतील उरण वैष्णवी हॉटेल ते बोरी नाका, रस्त्याचे अंतर 1 किलोमीटर, 

      रोहा नगर परिषद हद्दीतील तहसिल कार्यालय, रोहा ते दमखाडी नवरत्न हॉटेल पर्यंतचा  रस्ता, रस्त्याचे अंतर 1.4 किलोमीटर, 

       मुरुड-जंजिरा नगर परिषद हद्दीतील मुरुड एकदरा ब्रिज ते तवसाळकर पकटी, रस्त्याचे अंतर 400 मीटर, 

      महाड नगर परिषद हद्दीतील पिंपळपार ते भगवानदास बेकरी, रस्त्याचे अंतर 450 मीटर, 

      श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाजी मार्केट, रस्त्याचे अंतर 350 मीटर,

       कर्जत नगर परिषद हद्दीतील श्रध्दा हॉटेल ते चार फाटा रस्ता, रस्त्याचे अंतर 500 मीटर, 

       खालापूर नगर पंचायत हद्दीतील मौजे महड येथील वरदविनायक मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण दूर करणे, रस्त्याचे अंतर 500 मीटर, 

     पोलादपूर नगर पंचायत हद्दीतील शेतकरी बाजार ते गांधी चौक परिसर, रस्त्याचे अंतर 500 मीटर, 

      म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मुख्य रस्ता श्रीवर्धन गोरेगाव रोड, रस्त्याचे अंतर 500 मीटर,

      तळा नगर पंचायत हद्दीतील मंदाड रोड ते चंडिका मंदिर रोड,सोनार आळी ते मुंढे वाडी रोड, रस्त्याचे अंतर 1 किलो मीटर, 

      माणगाव नगर पंचायत हद्दीतील कचेरी रोड ते वाकडाईदेवी मंदिर परिसर, रस्त्याचे अंतर 1.6 किलो मीटर, 

     पाली नगर पंचायत हद्दीतील गांधी चौक ते एसटी बस डेपो, रस्त्याचे अंतर 700 मीटर.

     या अभियानात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आवश्यक यंत्रणा यांचा सहभाग करून घ्यावा, जेणेकरुन हे अभियान प्रभावीपणे राबविता येईल. अभियानामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधींचा सहभाग करून घ्यावा तसेच अभियानाच्या वेळी आवश्यक साधन सामुग्रीची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image