इनरव्हील तर्फे वनवासी कल्याण आश्रमात बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे Dist. Eso डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते अनावरण

इनरव्हील तर्फे वनवासी कल्याण आश्रमात बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे  Dist. Eso डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते अनावरण


पनवेल दि. 5 (प्रतिनिधी) ः इनरइव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन तर्फे दि. 4 एप्रिल 2023  रोजी  चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रम आदिवासी मुलांसाठी चे वस्तीगृह येथे सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प बसवण्यात आला. क्लब तर्फे  ongrid invertor 2KW आणि 2kw ग्रॉवात inverter   दिला आहे.

Dist. Eso   डॉ शोभना पालेकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे अनावरण झाले. क्लब अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी प्रकल्पाची माहिती थोडक्यात सांगितली. डॉ शोभना पालेकर यांनी मुलांना वीज बचतिचे महत्त्व आणि वीज बचत कशी करावी याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास क्लब माजी अध्यक्षा शुभांगी वालेकर, डॉ.साधना गांधी, डॉ. जयश्री पाटील, प्रतिभा लादे, ज्योती गुंदेचा इ.उपस्थित होते. तसेच वनवासी कल्याण आश्रम चे अधिकारी  सतिश गुणे व संदीप शिंदे उपस्थित होते. हे सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प बसवण्याचे काम हरित सोलार एनर्जीचे राजू श्रीखंडे यांनी उत्तमप्रकारे केलं आहे. या प्रकल्पामुळे वसतिगृहातील मुलांना खूपच उपयोग होणार आहे.