जुगार अड्ड्यावर धाड, पोलिसांची कारवाई
नवीन पनवेल :मोठा खांदा, गावाच्या पाठीमागे आयकर भवन च्या शेजारी पार्किंग मध्ये मोकळ्या जागेत सेक्टर 17, कामोठे या ठिकाणी तीन पत्ती जुगाराचा खेळ पैसे लावून खेळत असताना पाच जण पोलिसांना सापडून आले. त्यांच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे पोलिसांनी देविदास शंकर भुसारे, संतोष महादेव चेके, प्रफुल्ल सुधाकर मढवी, चंद्रकांत किसन गायकवाड, शिवा शरणप्पा पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या ठिकाणाहून पाच हजार एकशे वीस रुपये जप्त केले आहेत.