खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा;श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात श्री सदस्यांना सेवा
पनवेल : थोर निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघर येथे प्रदान करण्यात आला. 16 एप्रिल रोजी लाखो श्री सदस्य महाराष्ट्र व इतर राज्यातून आले होते. त्यांना प्रवासा दरम्यान जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ ता खालापूर येथे सेवा देण्यात आली .या वेळी शेकडो श्री सदस्यांना चहा नाश्ता पहाटे 3 वा पासून व्यवस्था करण्यात आली होती . मंदिराचा परिसर श्री सदस्यांच्या येण्याने फुलून गेला होता. यावेळी उपस्थित श्री सदस्यांनी मंदिर परिसरातील इतर सेवांचा सुद्धा लाभ घेतला. पहाटेच मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या पुढच्या महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यासाठी नंतर सर्वजण खारघर येथे मार्गस्थ झाले.