मंत्रालय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत
नवी मुंबई, दि.17 :- मंत्रालय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कोकण भवन शाखेने दिवंगत शासकीय कर्मचारी कै. संजय कोळी यांच्या कुटुंबियांना 20 हजार रुपयांची मदत केली.
विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी कै. संजय नवल कोळी यांचे दि. 28 मार्च 2023 रोजी अल्पश:आजाराने निधन झाले होते. कै. कोळी हे मंत्रालय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कोकण भवन शाखेचे सभासद होते. आज कै. कोळी यांच्या पत्नी श्रीमती इंदुमती संजय कोळी आणि त्यांचा मुलगा तुषार संजय कोळी यांना कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे पालक संचालक अजित न्यायनिरगुणे व खजीनदार सुधीर केळवणकर यांच्या हस्ते रुपये 20 हजार रोख देण्यात आले.
मंत्रालय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत एकता पॅनल निवडून आले होते. पॅनलचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सहाय्यक व्यवस्थापक अनिल सि. भगते, चेअरमन रमेश दौलत लवांडे आणि सचिव शशिकांत साखरकर यांच्या संकल्पनेतून क्रेडिट सोसायटीच्या सभासदाचा आस्किम मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रुपये 20 हजार मदत म्हणून देण्याची योजना सन 2023 पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. नवनियुक्त पॅनलचा हा निर्णय कौतुकास्पद आहे.