रेवदंडा-साळाव पुलावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी

                                                                                         रेवदंडा-साळाव पुलावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी


अलिबाग,दि.25 (जिमाका):-       

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता रेवदंडा-साळाव पुलावरून 5 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.

     त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या दि.3 मार्च 2023 च्या पत्रान्वये अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ- नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड - रोहा - तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रोहा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड - साळाव - तळेखार - चणेरा - रोहा -कोलाड - नागोठणे - वडखळ - पोयनाड - अलिबाग अथवा मुरुड - साळाव - तळेखार - रोहा - कोलाड - नागोठणे - पेझारी चेकपोस्ट- अलिबाग तसेच दुसरा मार्ग मुरुड - साळाव- तळेखार - रोहा - सुडकोली - वावे - बेलकडे - अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापरही करु शकतात, असे कळविले आहे.

   तरी नागरिकांनी येथे नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.