काळ्या काचा लावणाऱ्या ७६ वाहनांवर कारवाई
नवीन पनवेल : पनवेल वाहतूक शाखेकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर कारवाई ची मोहीम राबविण्यात आली.
२१ फेब्रुवारी रोजी पनवेल वाहतूक शाखेकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ७६ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वाहन चालकामध्ये वाहतूक नियमाचे पालन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली असून यापुढे ही अशीच चालू राहील. यापुढे वाहन चालक यांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पनवेल वाहतूक विभाग कडून कडक कारवाई करण्यात येईल असे संजय नाळे, पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा यांनी सांगितले आहे.
नेरे गावात चोरीचे वाढते सत्र
नवीन पनवेल : नेरे गावात चोरांनी धुमाकुळ घातलेला दिसून येत आहे. गेल्या ३ रात्रीत तिन ठिकाणी चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. नेरे खालचे आळीतील प्रभाकर तांबोळी यांच्या दुकानाचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. तर गजानन पाटील यांचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चोरट्यांनी आपले लक्ष तलावाजवळील गजानन मंदिराकडे वळवला.
गजानन महाराज मंदीरात चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतील हजार रुपये पळवले असल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांकडे कटावणी व इतर साहित्य असल्याचे दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेरे गावात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. रात्रीच्या वेळेस हे चोरटे नेरे गावात येऊन चोरी करत आहेत. नेरे मध्ये पोलीस चौकी आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठवड्यात नेरे स्टॉप जवळील एका ज्वेलर्सच्या पाठीमागील भिंत खोदण्याचे काम एका चोरट्याने केले होते. त्याला हटकल्या नंतर चोर पळून गेला होता. त्यामुळे वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता चोरट्याचा बंदोबस्त करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.