संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
नवी मुंबई दि.२२- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.