सायन पनवेल महामार्गावर धावत्या बसला लागली आग
नवीन पनवेल,मयूर तांबडे (पत्रकार): सायन पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. अग्नीशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.