नवी मुंबई
देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फिथिएटर येथे महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी इस्टेट मॅनेजर श्री. अशोक अहिरे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री. विलास मलुष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. उज्वला बारघरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी त्यातही महिला कर्मचारी सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी 'आम्ही सावित्रीच्या लेकी' म्हणत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.