बोगस मतदार नोंदणी संदर्भात पनवेल मधील पाच शाळांना नोटीस; गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे निर्देश
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस व दुबार नावे असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या पनवेल तालुक्यातील पाच विद्यालयांना पनवेल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी एस. आर. मोहिते यांनी नोटीस बजावली आहे. परिपूर्ण मतदार नोंदणी अर्ज व विहित नमुन्यातील योग्य प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य/ संस्थाप्रमुख यांची होती. मात्र हि जबादारी या पाच विद्यालयांनी योग्य रित्या पार पाडली नसल्याने त्या संदर्भातील तक्रार कोकण विभागीय आयुक्त तसेच रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर झाल्या होत्या. त्या अनुषंगाने कोणताही अनूचित प्रकार निवडणुकीच्या कालावधीत निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी पाच शाळांना गटशिक्षण अधिकारी यांनी नोटीस बजावली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत.
कोट-
शिक्षकांवर कारवाई होणे हे दुर्दैवी आहे, मात्र शिक्षकांच्या नावाने बोगस मतदान होणे हे अत्यंत चुकीचे आणि लोकशाहीला हानिकारक आहे. त्यामुळे बोगस पद्धतीने कुणीही मतदान करू नये, अन्यथा बोगस मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात माझे सहकारी काम करतील.- उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर