खारघर येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात

 खारघर येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात


पनवेल(प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'खारघर मॅरेथॉन २०२३' च्या अनुषंगाने खारघर येथे 'व्यसनमुक्ती' या विषयावर रांगोळी स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. 

      चतुर्भुज सोसायटी मधील ब्यूटिफुल शॉप च्या समोर (रविवार, दि. १५) रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती.हि स्पर्धा घेण्यामागचा प्रमुख उद्देश खारघर मधील सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करणे हा होता. या स्पर्धेमध्ये खारघर मधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील तसेच सोसायटीमधील स्पर्धकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला तसेच या स्पर्धेचे समन्वयक  नेत्रा पाटील खारघर रहिवासी संघटनेचे सदस्या साधना पवार तसेच रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड व या स्पर्धांचे इतर सर्व समन्वयक, इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवींद्र मोरे हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंजली खोंड, द्वितीय क्रमांक विलास पाटील तर तृतीय क्रमांक आदिती भट यांनी पटकाविले.