पेण-खोपोली महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश

पेण-खोपोली महामार्ग रुंदीकरणामुळे नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण होणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश


मुंबई, दि. २- पेण-खोपोलीरोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित झालेल्या कामार्ली येथील कुटुंबांकडून मोबदला देण्याची मागणी होत आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे  या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. 

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधितांना मोबदला देण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. आमदार महेंद्र दळवी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेसह पेण तालुक्यातील कामार्ली येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाचे  १८ मीटरचे रुंदीकरण करताना १५ स्थानिक ग्रामस्थांची घरे, दुकाने बाधित होत आहेत. त्याशिवाय ३० मीटरचे रूंदीकरण केल्यास बाधित होणाऱ्या घरांची संख्या १०० च्या आसपास जाते. केंद्र शासनाच्या नियमांनुसार जर अतिक्रमण काढताना कुणीही बेघर होत असल्यास त्याला नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे, कामार्ली येथून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ज्यांची घरे, दुकानांचे नुकसान झाले आहे, अशा सर्वांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज दिल्या. 


Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image