राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत "फ्लाईंग राणी " ची बाजी

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत "फ्लाईंग राणी " ची बाजी  

ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने सन्मान 
कलाकारांची लाभली मांदियाळी 



पनवेल (हरेश साठे ) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कलामंथन ठाणे संस्थेच्या "फ्लाईंग राणी " ने बाजी मारली. करंडकाचे विजेतेपद पटकावून बहुमानाचा अटल करंडक आणि ०१ लाख रुपये बक्षिसाचे ते मानकरी ठरले. 
      माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या करंडक उत्सवात ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा सन्मानचिन्हमानपत्रशाश्रीफळ व ५० हजार रुपये असे स्वरूप असलेल्या 'गौरव रंगभूमीचा' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   
        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने हि एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप हे होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. ०४) रात्री शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. 
           यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप, अभिनेते भरत साळवे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीता पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत,  माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, ऍड. चेतन जाधव, अभिषेक भोपी, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप, अक्षया चितळे, संजीव कुलकर्णी, वैभव बुवा, निखिल गोरे, उमेश वाळके, प्रतीकेश मोरे, ओमकार सोष्टे आदी उपस्थित होते .
      नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावेत्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावेतसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावायासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरमहापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. रंगमंच आमचा... कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन  गेली १५ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. त्यानंतर या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि राज्यभरातून नवोदित कलाकारांची मागणी लक्षात घेता. हि स्पर्धा राज्यस्तरीय झाली.  नामवंतउमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजनआकर्षक पारितोषिकेदर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
        
चौकट- 
अटल करंडक एकांकिका स्पर्धा राज्यभरात पोहोचली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या नाटकाचे प्रमोशन करण्याची संधी प्रसिद्ध नाटकांनी यावेळी सोडली नाही. सुप्रसिद्ध अलबत्या गलबत्या नाटकाची टीम, त्याचबरोबर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार यांनी 'हौस माझी पुरवा' या त्यांच्या नाटकांचे प्रमोशन करंडकात केले. त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील हास्य जत्रा फेम गौरव मोरे, रोहित माने, झी मराठी वाहिनीवरील फु बाई फु फेम स्नेहल शिगवण तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील 'स्वामी' मालिकेतील विजया बाबर, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील रोनक शिंदे यांनीही या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सदिच्छा भेट देऊन या करंडक स्पर्धेचे कौतुक केले. 
      
सविस्तर निकाल- 
राज्यस्तरीय एकांकिका : प्रथम क्रमांक- फ्लाईंग राणी (कलामंथन, ठाणे) ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- कंदील ( मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) ५० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- आखाडा (एकदम कडक, मुंबई ) २५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-  डोक्यात गेलंय (  सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे) १० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- अजूनही चांदरात आहे (ब्लॅक कर्टन, मुंबई) ०५ हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- हेड स्टडी  ( बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल ) ०५ हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,

 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम क्रमांक- यश पवार व ऋषिकेश मोहिते ( बारम- एम. डी . कॉलेज, मुंबई) ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- सिद्धांत सोनवणे ( कंदील - मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ) १५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- प्रशांत केणी (उकळी- कीर्ती कॉलेज, मुंबई ) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- विजय पाटील (फ्लाईंग राणी - कलामंथन, ठाणे) ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- प्रणय गायकवाड (आखाडा - एकदम कडक, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; 

अभिनेता : प्रथम क्रमांक- देवेन कोलमकर ( बारम-एम. डी . कॉलेज, मुंबई  ) ०२ हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- प्रथम तायडे (कंदील -मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ) १५०० रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- हिमांशू वैद्य ( हेड स्टडी - बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल ) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- प्रफुल्ल आचरेकर (डोन्ट क्वीट- स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई ) ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- अनिकेत मोरे (गोदा -माय नाटक कंपनी, मुंबई ) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह;

 अभिनेत्री : प्रथम क्रमांक- निकिता घाग ( फ्लाईंग राणी- कलामंथन, ठाणे) ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- मानसी नाटेकर (अजूनही चांदरात आहे - ब्लॅक कर्टन, मुंबई) १५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय-विजया गुंडप (आखाडा -एकदम कडक, मुंबई ) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- दिपश्री शर्मा  (थँक्यू-आरडी क्रिएशन, मुंबई ) ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- सानिका कुंभार (उकळी- कीर्ती कॉलेज, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; 

संगीत : प्रथम क्रमांक- शुभम ठेकले (बारम-एम. डी . कॉलेज, मुंबई  )  दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- अभिषेक कासार  (कंदिल- मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ) १५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- अजूनही चांदरात आहे(ब्लॅक कर्टन, मुंबई) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- डोन्ट क्वीट (स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) - पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- शुभम राणे (फ्लाईंग राणी- कलामंथन, ठाणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; 

प्रकाश योजना : प्रथम क्रमांक - श्याम चव्हाण ( बारम- एम. डी . कॉलेज, मुंबई) ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- अन्नपूर्णा हाजीर हो (रंगवेद, मुंबई) १५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- सिद्धेश नांदलस्कर (काहीतरी अडकलंय-गुरु नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय, मुंबई ) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- डोन्ट क्वीट(स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) - पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- अजूनही चांदरात आहे ( ब्लॅक कर्टन, मुंबई), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह;

सर्वोत्कृष्ट लेखक : प्रथम क्रमांक - चैतन्य सरदेशपांडे  ( उकळी- कीर्ती कॉलेज, मुंबई ) ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- मोहन बनसोडे  (फ्लाईंग राणी-कलामंथन, ठाणे) १५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- अनिकेत खोले (डोन्ट क्वीट-स्वप्नपूर्ती क्रिएशन, मुंबई) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- वैभव मावळे (कंदिल- मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव)- पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ- हेड स्टडी  ( बॅकस्टेजवाला ग्रुप, पनवेल ), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह;


 विशेष पारितोषिके : सर्वोत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ)- बारम - ०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका - उकळी - ०७ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार- बबन माने ( आखाडा)- ०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सर्वोत्कृष्ट बालकलाकर - गायत्री सोनवणे - ०२ हजार रुपये, सन्मानचिन्ह. 


उत्कृष्ट नेपथ्य - प्रथम क्रमांक- साहिल अद्वैत ( काहीतरी अडलंय), द्वितीय क्रमांक - शोधयात्रा,  तृतीय क्रमांक - सुमित पाटील (अन्नपूर्णा हाजीर हो), चतुर्थ क्रमांक - दर्शन आबनावे व यश पवार (बारम), उतेजनार्थ क्रमांक - प्रवास. 

रायगड जिल्हा प्राथमिक फेरी - प्रथम क्रमांक - हेड्स्टडी (बॅकस्टेज वाला ग्रुप, पनवेल )-१० हजार रुपये व सन्मानचिन्ह , द्वितीय क्रमांक- तुंबई (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, पनवेल)- ०६ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक- लपंडाव (पिल्लेज कॉलेज, पनवेल )-०४ हजार रुपये व सन्मानचिन्ह.