खालापूर येथे दिव्यांगांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीर संपन्न
अलिबाग,दि.3(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने व उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.3 डिसेंबर रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांच्या पुढाकारातून खालापूर येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी मतदार जनजागृती अभियान व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये दिव्यांग नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात आले.