संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संविधान रॅली संपन्न

संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संविधान रॅली संपन्न



अलिबाग,दि.26(जिमाका):- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहायक आयुक्त,  सुनिल जाधव यांच्या हस्ते अलिबाग शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास सकाळी 10.30 वाजता पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले. 

      या रॅलीत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी नितीन मंडलिक, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुरेखा दळवी, अरविंद निगळे, दिलीप जोग, बी.जी.पाटील, प्रा. डॉ. प्रेम आचार्य, दादासाहेब खंडारे, संजय वानखेडे, ॲड. श्रीम. श्रध्दा ठाकूर, किशोर पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कार्यालयाचे कर्मचारी, समाज कल्याण जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी, मुलांचे व मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुले- मुली व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर संविधान जागर चे कार्यकर्ते, जे.एस.पी.एम.कॉलेजमधील एन.एस.एस. चे विदयार्थी, प्रभाकर पाटील लॉ कॉलेजचे विदयार्थी उपस्थित होते. साधारणत: रॅलीत अंदाजे 400 ते 500 नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रॅलीत ॲड.लिमये हे 92 वर्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

      रॅली शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत  काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधानाबाबत घोषणा देण्यात आल्या. 

   याप्रसंगी जे.एस.एम. व पी.एन.पी. महाविदयालयाचे प्रवेशित व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  प्रा.आचार्य यांनी केले.

      या रॅलीचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी स्वागत केले. शेवटी संविधान प्रास्ताविकेचे सार्वजनिक वाचन करुन त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या आणि या रॅलीचा समारोप करण्यात आला.