शेकापला करंजाडेत आणखी एक धक्का; शेकाप कार्यकर्ते भाजपात
पनवेल(प्रतिनिधी) शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजाडे येथील लालवाडी आदीवासी मधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शेकापचे रोहिदास वाघे यांच्या नेतृत्वाखाली आदीवासी बांधव आणि भगीनींनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाला.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यावर्ती कार्यलयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी बंदु देवजी वाघे, वेगु देवजी वाघे, गोविंद वाघे, राधिका वाघे, सुदाम वाघे, तुळसा वाघे, रोहिदास वाघे, वनिता वाघे, गंगा वाघे, बंधू पवार, उज्वला पवार, सुमन पवार यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, सागर आंग्रे, सुनील भोईर, तुशार नागे, सुरज शेलार, अतिश साबळे, जनार्दन फडके, रवी राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.