कांदळवन सरंक्षण समिती, कामोठे अणि मँन्ग्रोव्हज सोल्जर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन स्वच्छता मोहिम पार पडली

कांदळवन सरंक्षण समिती, कामोठे अणि मँन्ग्रोव्हज सोल्जर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन स्वच्छता मोहिम पार पडली


कामोठे(प्रतिनिधी)- आज कामोठे सेक्टर 36 येथील खाडी परिसरात कांदळवन सरंक्षण समिती, कामोठे अणि मन्ग्रोव्ह सोल्जर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन स्वच्छता मोहिम पार पडली. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तसेच खाडी किनारी वसलेल्या शहरांच्या सुरक्षेसाठी कांदळवन वाचवणे फार गरजेचे आहे. दुर्दैवाने कामोठे शहरातील सेक्टर 36 लगतच्या कांदळवनात मोठ्या प्रमाणात डेब्रिज, घरगुती कचरा टाकल्याचे समितीच्या निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी मासेमारीसाठी बांध टाकुन खाडीचे पाणी आडविले जात असल्याचे निदर्शनास आले त्यामूळे कांदळवनास ताजे पाणी पुरवठा न झाल्याने अनेक कांदळवने मारल्या गेली. ह्यावर वन विभागाकडे तक्रार करताच वन विभागाकडून बांध तोडण्यात आले. परंतू कचरा काही कमी होत नसल्याने आज भुमी टॉवर सोसायटीचे सेक्रेटरी विलास कळंगे ह्यानी धर्मेश बराई अणि त्यांच्या मन्ग्रोव्ह सोल्जर संस्थेला स्वच्छता मोहिमेसाठी विनंती केली होती. त्यानूसार आज सकाळी 7 ते 10 च्या दरम्यान सेक्टर 36 च्या खाडीपरिसराची स्वच्छता करण्यात आली. कांदळवन सरंक्षण समिती अणि मन्ग्रोव्ह सोल्जर ह्यांच्या वतीने जवळ पास 70 स्वयंसेवकांनी आज स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्याचबरोबर तेरणा इंजीनियरिंग अणि सरस्वती इंजीनियरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)चे विद्यार्थी, वनविभागाच्या वतीने मंगल ओव्हळ अणि पंचशीला कांबळे ( वनरक्षक) अणि पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी सुद्धा मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेदरम्यान खाडी परिसरातील डेब्रिज, बायो मैडिकल वैस्ट, प्लास्टिक, घरगुती कचरा, निर्माल्य मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आले. 

कांदळवन सरंक्षणासाठी खाडी परिसरात कचरा न टाकण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे तसेच कचरा टाकता येऊ नये म्हणून खाडी लगत सरंक्षक जाळी बसविण्यासाठी समितीच्या वतीने पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिम घेण्याचे समितीचे नियोजन आहे. 

ह्या मोहिमेत धर्मेश बराई,  डॉ.अरुणकुमार भगत,  रंजना सडोलीकर, मंगेश अढाव , बापु साळुंखे,  स्वप्निल काटकर, विलास कलंगे, नीरव नंदोला,  जयश्री झा, संगीता पवार,  गीता कुडाळकर, शुभांगी खरात, खुशी सावर्डेकर, महेंद्र जाधव, देवानंद बाठे, संदिप इथापे, सुनिल आडे, सचिन खरात, शुभम पवार, सत्यविजय तांबे, अशोक जेथे ह्यांच्या सह कामोठे कॉलोनी फोरम, दिशा महिला मंच अणि इतर सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image