शुक्रवारपासून अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

शुक्रवारपासून अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी

ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने होणार सन्मान 
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची असणार मांदियाळी 
विजेता एकांकिकेला ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक 

पनवेल (हरेश साठे) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक २ ते ४ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये होणार आहे. 
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या महाअंतिम फेरीचे उदघाटन ०२ डिसेंबर तर पारितोषिक वितरण ०४ डिसेंबरला सायंकाळी ६. ३० वाजता होणार आहे. 
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा 'गौरव रंगभूमीचा' या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड.  शैलेश गोजमगुंडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांची तर प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप यांची आदरणीय उपस्थिती असणार आहे. 
            नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो.  त्या अनुषंगाने यंदाही राज्यातील विविध केंद्रावर प्राथमिक फेरी संपन्न होऊन महाअंतिम फेरीसाठी २५ एकांकिकांची निवड मान्यवर परीक्षकांनी केली आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या स्पर्धेत नाट्य एकांकिकांची पर्वणी असते, त्यामुळे या स्पर्धेचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, स्पर्धा सचिव एस. के. पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. 
         
--------------------अशी आहेत पारितोषिके :-------------------------------------------
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक,
 द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, 
तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, 
चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ एकूण दोन बक्षिसे प्रत्येकी ०५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे असून या प्रमुख बक्षिसांचे प्रायोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आहे. 

वैयक्तीक व विशेष बक्षिसांचे प्रायोजक नील ग्रुप असून ती बक्षिसे खालीलप्रमाणे- 
सर्वोत्कॄष्ठ अभिनेता( वैयक्तिक
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ अभिनेत्री (वैयक्तिक 
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक (वैयक्तिक 
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ लेखक (वैयक्तिक) 
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ संगीत ( वैयक्तिक 
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ नेपथ्य ( वैयक्तिक
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

सर्वोत्कॄष्ठ प्रकाश योजना (वैयक्तिक
प्रथम क्रमांक ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक ०१ हजार ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक ५०० रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उतेजनार्थ - प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

अंतिम फेरीकरिता विशेष पारितोषिके 
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका, महाराष्ट्रातील अस्सल मायबोली एकांकिका, लोककलेवर आधारित एकांकिका, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार व बाल कलाकार यांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 

महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका- गाभारा (मोर्डेन कॉलेज शिवाजी नगर),  शोधयात्रा (सहज), रंगा येई हो (इष्टमन कलर), कम्युनिकेशन एरर (निर्मिती नाट्यसंस्था), कुपान (गोगटे जोगळेकर महाविद्यालय), कंदील (मुजी जेठा महाविद्यालय), अशांती पर्व (यज्ञसेन रंगभूमी), ओल्या भिंती (कलासक्त), हेड स्टडी (बॅकस्टेज वाला ग्रुप), तुंबई (सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय), लपंडाव (डॉ. पिल्लई कॉलेज), नातीचरामी (फ्रायडे फिल्म्स, अलिबाग), डोक्यात गेलंय- (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय), टिनीटस- (कलरफुल माँक), डोन्ट क्विट- (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स), फ्लाइंग राणी- (कलामंथन), काहीतरी अडकलंय- (गुरु नानक खालसा स्वायत्त्य महाविद्यालय), बारम - (एम.डी. कॉलेज), उकळी - (कीर्ती कॉलेज), प्रवास- (भवन्स महाविद्यालय), आखाडा-(एकदम कडक), अन्नपूर्णा हाजीर हो- (रंगवेद), गोदा - (माय नाट्यकंपनी ), अजूनही चांदरात आहे- (ब्लॅक कर्टन), थँक्यू - (आर डी क्रिएशन्स).