चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ८ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ‘अ’ ग्रुप आणि राष्ट्रीय छात्रसेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.