कपल बार वरील आकसापोटी करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा सरसकट नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

कपल बार वरील आकसापोटी करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा सरसकट नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी  


पनवेल दि २२, (वार्ताहर )  :  पनवेल तालुक्यातील भिंगारी गावाच्या हद्दीत असलेल्या कपल   बारवर  मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने नुकतीच केलेली कारवाई हि विशिष्ट आकसापोटी करण्यात  आल्याने  या कारवाई बाबत  संताप व्यक्त केला जात आहे.  

                               पनवेल  शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात लेडीज बार, ढाबे व रेस्टॉरंट आहेत. शासनाने या सर्वांना नियमावली दिली असून   त्या  नियमावली नुसारच तेथील मालकाला आपला व्यवसाय करावा लागतो, परंतु अनेक जण या नियमांना बगल देत आपला व्यवसाय राजरोसपणे करीत असतात अश्यांवर पोलीस खात्यातील वेगवेगळे विभाग कारवाई करते अश्याच प्रकारची कारवाई चार दिवसापूर्वी कपल बार वर करण्यात आली , परंतु या बार च्या हाकेच्या अंतरावर इतर अनेक लेडीज बार असताना व ते उशिरा पर्यंत सुरु असताना त्यांच्यावर कारवाई एकाच वेळी करण्याचे टाळून फक्त मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने हि कारवाई केल्याने याला वेगळाच वास येत असल्याचे बोलले जात आहे. १५ दिवसापूर्वीच नवी मुंबई आयुक्तालयातील अनेक अधिकारी वर्गांच्या बदल्या झाल्या आहेत या बदल्या मध्ये नव्याने आलेले अधिकारी आपला दबदबा तसेच इतर अनेक गोष्टी पदरी पाडून घेण्यासाठी अश्या प्रकारे कारवाया नेहमीच करत असतात अशाच प्रकारे हि कारवाई असेल तर कपल बार वरच हि कारवाई का ? असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. अश्या प्रकारे उशिरा चालणाऱ्या पनवेल तालुक्यातील सर्वच  लेडीज बार, ढाबे व रेस्टॉरंट वर मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे. आगामी अधिवेशनात बार वरील कारवाईचा विषय गाजणार असण्याचे बोलले जात आहे .

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image