साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू-शेकापच्या पाठपुराव्याला यश"

साईनगर- कर्नाळा स्पोर्ट्स जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू-शेकापच्या पाठपुराव्याला यश"

            

पनवेल: साई नगर येथून कळंबोली ला कर्नाळा स्पोर्ट्स मार्गे  जाण्यासाठी  पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत कच्चा रस्ता आहे. सदरचा रस्त्याच्या शेजारी अपटाऊन अवेन्यू ,सुशील ब्लॉसम, दुर्वांकुर, सुशील रुक्मिणी इमारती आहेत सदर इमारतीत एकंदरीत हजार ते बाराशे लोकवस्ती आहे. तसेच सदरचा रस्ता साईनगर वासियांना पनवेलच्या बाहेर जाण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी असते.
   पावसाळ्यामध्ये सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम श्री.प्रितम दादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सौ.सारिकाताई भगत यांनी रहिवाशीयांना करून दिले होते. त्यानंतर सदर रस्ता हा डांबरीकरण करावा या रहिवाशांनी केलेल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी  संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून सदर रस्त्याची पाहणी करून नागरिकांना होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी अशी सूचना केली होती. प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पनवेल महानगरपालिके मध्ये सौ.सारिकाताई भगत यांनी पाठपुरावा केला. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची स्वतः जातीने उपस्थित राहून श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका सौ सारिका ताई भगत , नगरसेविका डॉ.सौ.सुरेखा मोहोकर आणि शेकाप पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले त्यामुळे तेथील रहिवासी यांनी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे आभार मानले.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image