गार्डन मधील अनावश्यक असणारे शौचालय रद्द करा,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर 3 येथील भूखंड क्रमांक 56 आणि 57 या गार्डन भूखंडावर नव्याने सुशोभीकरण होत आहे. ते होत असताना सदरच्या प्लॅनिंग मध्ये दोन्ही ठिकाणी शौचालय नव्याने उभारणी होत आहे. सदर गार्डन पासून 50 ते 100 मीटर अंतरावर दोन्ही बाजूवरील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक शौचालय आहेत. तसेच त्या परिसरात राहणाऱ्या आणि त्या परिसरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सद्यस्थितीमध्ये सुरू असलेली दोन्ही शौचालय आहेत. असे असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेल्या गार्डनमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात आल्याने नागरिकांच्या पैशाचा व्यवस्थित वापर होत नाही तसेच गार्डन मधील जागा शौचालयासाठी विनाकारण वापरली जात होती.