जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

 

जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर


     अलिबाग, दि.09 (जिमाका):- राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने आज जाहीर केले आहे.

     *राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022 चा तपशील पुढीलप्रमाणे:-* ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसिलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्राची छाननी दि.5 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि.7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान दि.18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी दि.20 डिसेंबर 2022 रोजी होईल. निकालही त्याच दिवशी घोषित करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दि.23 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

     रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील 6, मुरुड तालुक्यातील 5, पेण तालुक्यातील 26, पनवेल तालुक्यातील 10, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील 7, खालापूर तालुक्यातील 14, रोहा तालुक्यातील 5, सुधागड तालुक्यातील 14, माणगाव तालुक्यातील 19, तळा तालुक्यातील 1, महाड तालुक्यातील 73, पोलादपूर तालुक्यातील 16, म्हसळा तालुक्यातील 13, श्रीवर्धन तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका दि.18 डिसेंबर 2022 रोजी होणार असून त्याचा निकाल दि.20 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.



Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image