कळंबोलीत हजारो रुपयांचा गुटखा साठा जप्त

 कळंबोलीत हजारो रुपयांचा गुटखा साठा जप्त


पनवेल दि.२७(वार्ताहर): कळंबोली वसाहत परिसरातून  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या चार पान टपऱ्यांवर छापा मारून हजारो रुपये किंमतीचा गुटखा व पान मसाला जप्त केला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सर्व पान टपऱ्या सील करून चारही चालकांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

                       औषध प्रशासन विभागाच्या पेण युनिटने कळंबोली से. १ मधील अरविंदकुमार दुबे, बल्लू राजबहादुर चौरसिया, राजेद्र चव्हाण, अनंतलाल गुप्ता यांच्या पान टपऱ्यांची तपासणी केली. या सर्व पान टपऱ्यांमध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधीत सुपारी असा हजारो रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने त्यांच्याकडे खरेदी बिलांबाबत तसेच पुरवठादारांबाबत चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने चारही पान टपरी चालकांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात चारही चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image