रायगडची कन्या कु.ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात "लेफ्टनंट ऑफिसर' म्हणून नियुक्ती

रायगडची कन्या कु.ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात  "लेफ्टनंट ऑफिसर' म्हणून नियुक्ती


पनवेल (प्रतिनिधी)-  रायगडची कन्या कु. ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात  "लेफ्टनंट ऑफिसर' म्हणून नियुक्ती झाली आहे. मुळची पळस दरी येथील रहिवाशी असलेली ऋचा हीचे आठवी पर्यंतचे शिक्षण खोपोली येथे शिशु मंदिरात झाले तर आठवी ते बारावी शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूल मध्ये घेतले होते. ऋचा हीने जिल्हा व राज्य स्तरावर  तलवार बाजी खेळामध्ये सुवर्ण पदके मिळवली असून ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. तिने  रसायनी येथील पिल्लई कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मधून पदवी प्राप्त केली आहे.  केंद्रीय लोकसेवा घेतली  घेतली जाणाऱ्या सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे ती एसएसबी मुलाखती मध्ये उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे तिला चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे (ओटा) येथे  प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. नुकतेच तिने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेड झाली आहे. कु. ऋचा ही भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्त झाली आहे. तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image