ज्येष्ठ नागरिक बबन मांडवकर यांचे निधन


ज्येष्ठ नागरिक बबन मांडवकर यांचे निधन 



पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील लाडिवली येथील ज्येष्ठ नागरिक बबन बंडू मांडवकर यांचे नुकताच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा गणेश, सून, नातवंडे, तसेच मांडवकरकुटुंब असा परिवार आहे. 

         यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.  प्रेमळ आणि हसतमुख स्वभाव राहिलेले  बबन मांडवकर हे 'आप्पा' या नावाने ओळखले जात होते.त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबरला श्री क्षेत्र गुळसुंदे येथे तर उत्तर कार्य लाडीवली येथे राहत्या घरी शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.