जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत


     *अलिबाग, दि.28 (जिमाका):-* अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि.29 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर 28 व शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील 15 तालुक्यातील इच्छुक अर्जदारांकडून दि.07 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

     जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांची नियुक्तीसंबंधी तपशिलवार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकांवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

     तरी जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांनी संबंधित तहसिल कार्यालयाकडे अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे.