वेगळी वाट जोखणाऱ्या सिटीबेल वृत्त समूहाचा दिवाळी अंक वाचलाच पाहिजे- रविशेठ पाटील
मान्यवरांच्या मांदियाळीत सिटीबेलचा इंग्लिश दिवाळी विशेषांक वाचकांच्या सेवेत रुजू
सलग तिसऱ्या थीम बेस्ड दिवाळी अंकाचे सर्वत्र होत आहे कौतुक
पनवेल (प्रतिनिधी)- सिटीबेल वृत्त समूहाच्या तिसऱ्या इंग्लिश दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या मांदीयाळीमध्ये बेलापूर रेल्वे संकुलामधील प्रशस्त कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रकाशन करण्यात आले. शानदार प्रकाशन सोहळ्याला श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष तथा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टिटेटिव्ह कमिटीचे सन्माननीय सदस्य अभिजीत पांडुरंग पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम गोकुळ शेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सिटीबेल विशेषांकाचे प्रकाशन झाल्यानंतर आपल्या भावना प्रकट करताना रवीशेठ पाटील म्हणाले की, एकसुरी पद्धतीच्या दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत सिटीबेल वृत्त समूहाचां टीम वर आधारित विशेषांक विशेषत्वाने उठून दिसतो. मंदार धोंडे आणि विवेक पाटील यांची दुसरी पिढी पत्रकारितेत सक्रिय झाल्याचे पाहून फार आनंद झाला. कोरोना कालखंडामध्ये अख्खे जग थांबले असता सिटी बेल वृत्त समूह मात्र अधिक जोमाने काम करत असल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. रामदास शेवाळे यांनी देखील विवेक पाटील, मंदार दोंदे, वैभव सोनटक्के या त्रिदेवांचे कॉम्बिनेशन नाविन्याची कास धरत काहीतरी वेगळं करण्याच्या ध्येयाने प्रेरित असतात असे म्हटले तसेच सिटीबेलच्या अप्रतिम अंकाचे तोंड भरून कौतुक केले. सुदाम पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्व लेख प्रसिद्ध केल्याबद्दल वृत्त समूहाचे अभिनंदन केले, तर वास्तववादी कंटेंट, अप्रतिम डिझाईनिंग, क्वालिटी प्रिंटिंग आणि एलिगंट लूक असणारा सिटीबेल दिवाळी विशेषांक झाला असल्याचे कॉम्प्लिमेंट अभिजीत पाटील यांनी दिले. तब्बल तीस हजार हार्ड कॉपी वाचकांच्या सेवेत रुजू असणार आहेत. तर सिटी बेल अँड्रॉइड एप्लीकेशन, सिटी बेल न्यूज पोर्टल या डिजिटल माध्यमांवर डिजिटल स्वरूपातील अंक वाचकांना वाचता येणार असल्याचे संपादकीय मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे..