पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : आरोग्य विभागातील कोविड काळात रुजू केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त ह्यांच्या पत्राद्वारे ९ सप्टेंबर २०२२ रोजी पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे केली होती. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात आगामी काळात सार्वजनीक आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या ७ हजार पदांसाठी कोविड काळात सेवा दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुणांकन करून त्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मागणीला यश आले आहे.