आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संघटनेचा 4 ऑक्टोबरला नवी मुंबई ,विष्णुदास भावे येथे सातारारत्न पुरस्कार व दसरा मेळावा
*पुरस्कारासाठी नामांकन मागण्याचे आवाहन*
*आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारावासियांचे स्नेहसंमेलन व दसरा मेळावा 4 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी विष्णुदास भावे सभागृह,नवी मुंबई, येथे होणार असून त्यानिमित्ताने राजकीय, कला, प्रशासकीय, साहित्य, उद्योग, कामगार, कायदा, सहकार, वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक अशा क्षेत्रातील किर्तीवंतांचा सातारा रत्न देऊन सत्कार करण्यात येणार आहे.वरील विभागासाठी नामांकन पाठवण्यासाठी amhisatarkar12@gmail. com वर मेल करावा अथवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान व्दारा बी /१, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, डॉक्टर कम्पाउंड ,चिंचपोकळी- पूर्व, मुंबई- १२ या पत्यावर पाठवावे,याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सातारकरांना सातारा भूषण देऊन गौरवण्यात येणार आहे. असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले आहे*.
*मुंबई ,नवी मुंबई व ठाणे परिसरातील सातारावासियांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून अल्पावधीत संघटनेची व्याप्ती वाढलेली आहे. संघटनेच्या वतीने स्पर्धात्मक परिक्षा मार्गदर्शन, वधु वर सूचक मंडळ, हळदी कुंकू समारंभ, व्यक्तीविकास शिबीर, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सन्मान आदी उपक्रम सुरु असून भविष्यातील आपल्या मोबाईलवर टाईप करा AMHI व ९३५५४९२२०० या नंबर वर SMS करा.अधिक माहितीसाठी संपर्क . ९९८७१९९५६५/०२२ २३७४९६३८*