लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथे जलकुंभाचे लोकार्पण
पनवेल(प्रतिनिधी) सिडकोच्या माध्यमातून आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने कोपर येथे उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
या कार्यक्रमास उद्योजक जे. एम. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी पं. स. सदस्य रघुनाथशेठ घरत, हरिभाऊ पाटील, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच रामदासशेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य व महिला मोर्चा उलवे नोड अध्यक्ष योगिता भगत, कामिनी कोळी, सुनिता घरत, उषा देशमुख, भाजप तालुका चिटणीस जयवंत देशमुख, उलवे नोड उपाध्यक्ष किशोर पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, ज्येष्ठ नेते भाऊशेठ भोईर, दामोदर भोईर, अंकुश ठाकूर, व्ही. के. ठाकूर, आशिष घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सिडकोच्या माध्यमातून जीआयए योजनेंतर्गत ०१ कोटी ३७ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या जलकुंभात भूमिगत पद्धतीने चार लाख लिटर तर जमिनीवरील बांधण्यात आलेल्या जलकुंभात दोन लाख लिटर अशी एकूण सहा लाख लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची उचल करण्यासाठी पंप हाऊसचीही निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे याचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.